नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सुधाकर भांबर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या धिसभा सदस्य सार्वत्रिक निवडणुकीत प्राचार्य प्रतिनिधी पदी प्रचंड मतांनी विजयी झाले. ही लढाई खूप अतातटीची होती. यात नऊ उमेदवार या शर्यतीत होते, त्यातून डॉ. भांभर यांची निवड झाली आहे. . त्यांना २०२१ हेल्थ अँड वेलनेस कॉनक्लेव्ह हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील इंडियन फार्माकोपिया,युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया, इंडियन ड्रग मॅनुफॅक्चरर असोशिएशन आणि नॅशनल चेम्बर ऑफ फार्मासुटिकल् मॅनुफॅक्चरर, श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला उत्कृष्ट प्राचार्य अवार्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर २०२१ -२२ करीत संस्थेकडून सुद्धा उत्कृष्ट प्राचार्य अवार्ड मिळालेला आहे.
आजची विजयाची बातमी समजताच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे, संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही.एस.मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीष आडके, विश्वस्त संपदा हिरे, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेश शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. न या विजयामध्ये संस्थेचा, महाविद्यालयातील सर्वांचा त्याच बरोबर माझ्यावर विश्वास ठेऊन मला मत दिले त्या सर्व मतदारांचा मी खूप खूप आभारी आहे, असाच आपला स्नेह लाभो असे त्यांनी आर्वजून सांगितले. विजयानंतर लगेचच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांचा डॉ. प्रफुल्ल पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Principle Dr Rajendra Bhambar Selection
Pune University