इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार, 2024 अंतर्गत नोंदणी आणि नामांकन सादर करण्याची प्रक्रिया 20 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली.
खालील श्रेणींमध्ये नामांकने मागवण्यात आले होते:-
श्रेणी 1 -11 प्राधान्य क्षेत्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास. या श्रेणीमध्ये 5 पुरस्कार प्रदान केले जातील
श्रेणी 2 – आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम. या प्रकारात 5 पुरस्कार प्रदान केले जातील
श्रेणी 3 – केंद्रीय मंत्रालये,विभाग, राज्ये, जिल्ह्यांसाठी नवोन्मेष.या श्रेणीमध्ये 6 पुरस्कार प्रदान केले जातील
अर्जदारांद्वारे अपलोड करावयाच्या डेटाची आवश्यकता आणि विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेऊन, सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2024 अंतर्गत वेब-पोर्टल (www.pmawards.gov.in) वर नोंदणी आणि ऑनलाइन नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 14.02.2025 वरुन वाढवून 21.02.2025 (23.59 वाजेपर्यंत) पर्यंत वाढवण्यात आली आहे.