नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडोनेशियातील बाली शहरात जी २० शिखर परिषद पार आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत इतर देशांच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित आहेत. नुकतीच मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी भेट झाली. मूळ भारतीय वंशाचे असणारे सुनक आणि मोदी यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांचा जी २० परिषदेत सहभागी झाले आहेत. जी २० परिषदेत नरेंद्र मोदी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारतीय तरूणांना ब्रिटनमध्ये येऊन नोकरी करण्याची इच्छा असते. या संदर्भातही या भेटीत चर्चा झाली. सुनक यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. जी २० शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि मोदी यांचीही भेट झाली. भारत – अमेरिका मैत्रीचे संबंध या परिषदेदरम्यानही दिसून आहे.
अनेक भारतीय तरुणांना ब्रिटनमध्ये जाऊन नोकरी करण्याची इच्छा असते. व्हिसा मिळणावण्यासाठी या तरूणांना प्रतिक्षा करावी लागते. त्यांच्यासाठी सुनक यांनी मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी भारतीय तरुणांना ब्रिटनमध्ये नोकरीसाठी व्हिसा मिळणार आहे. दरवर्षी तीन हजार तरूणांना नोकरीसाठी ब्रिटनचा व्हिसा मिळणार आहे, अशी घोषणा सुनक यांनी केली आहे.
Glad to see you PM @RishiSunak. Looking forward to working together in the times to come. @10DowningStreet pic.twitter.com/lvnW3PXd1N
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2022
Prime Minister Rishi Sunak Big Announcement G20
PM Narendra Modi Britain Visa Youth