नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकाला आदरांजली वाहिली. मोदी म्हणाले की, हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेमुळे विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते असे मोदी यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य दिले आणि पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याची काळजी घेतली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले: वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे आदरांजली वाहिली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेमुळे विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य दिले आणि पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याची काळजी घेतली. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.