नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गेल्या दोन वर्षांपासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करतात. परंतु त्याचबरोबर ते स्वतः देखील मास्क लावूनच सर्वांशी बोलतात. परंतु कानपूर येथील कार्यक्रमात मात्र थोडेसे विपरीत आणि उलट घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील कानपूरला पोहोचले. तेथे त्यांनी कानपूर आयआयटीच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले आणि कानपूर मेट्रोचे उद्घाटनही केले. या भेटीच्या अनेक छायाचित्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घातलेले दिसत नाहीत. आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये देखील त्यांनी मास्क घातलेला नाही. याबाबत सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
मोदींचे फोटो शेअर करताना अनेक काँग्रेस नेत्यांनी टिका केली आहे. सर्वसामान्य ट्विटर युजर्सही याबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. काही युजर्स म्हणतात की, पंतप्रधान स्वतः मास्क घालत नाहीत, ते इतरांना ज्ञान का देतात, तर काही जण लिहित आहेत की, एवढी मोठी रॅली काढल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी कोरोनाची भर घातली. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत लिहिलेले होते की, नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असून हे शब्द पाळत नाहीत आणि मास्क न घालता फिरत आहेत, हे किती विसंगत आहे पहा. आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हातात मास्क ठेवला होता. त्याचा व्हिडिओ शेअर करताना माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी लिहिले की, ‘मास्कचा पुरेपूर वापर करा- पीएम नरेंद्र मोदी, वो हाथों में लटका तो है!’
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1475836265123631108?s=20
योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो व्हायरल होत आहे, लोक अशा कमेंट करत आहेत. या फोटोवर संजय चतुर्वेदी नावाच्या युजरने कमेंट केली की, पंतप्रधानांनी मास्क लावला तर फोटो कसा येईल. खराब फोटोंची किती काळजी करता? अनामिका सिंह नावाच्या युजरने लिहिले – कोरोना दिवसा येत नाही असे दिसते, त्यामुळेच पंतप्रधान मास्कशिवाय फिरत आहेत. पण मग योगीजींनी ते का ठेवले आहे? सुनील कुमार यांनी टिप्पणी केली – डोनाल्ड ट्रम्प हे मास्क न घालता कुठेही गेले तरी चालते, त्यांचा ही असाच विचार होता. आता अमेरिकेतील परिस्थिती सर्वांनी पाहिली आहे.
भारतात कोरोनाची स्थिती अशी आहे की, गेल्या २४ तासांत देशात ९,१९५ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ७,३४७ बरे झाले आहेत. त्याचबरोबर ३०२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत देशात ओमिक्रॉन या प्रकाराची ७८१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी २४८ बरे झाले आहेत. मात्र लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा की, सर्वांनी कोरोना नियमाचे पालन करायला हवे, मग तो देशातील कोणताही नागरिक असो की, देशाचे पंतप्रधान असो.