नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
गेल्या महिन्यात २२ व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी केलेल्या यशस्वी रशिया दौऱ्याची पंतप्रधानांनी यावेळी आठवण केली.
दोन्ही नेत्यांनी अनेक द्विपक्षीय मुद्यांवरील प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि अतिशय महत्त्वाची धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याच्या उपायांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.त्यांनी परस्पर हिताच्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही एकमेकांसोबत विचार विनिमय केला.
दोन्ही नेत्यांनी सध्या सुरू असलेल्या रशिया- युक्रेन संघर्षावर आपापले विचार मांडले. पंतप्रधानांनी आपल्या नुकत्याच केलेल्या युक्रेन भेटीतला दृष्टीकोन सामाईक केला. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर संवाद आणि मुत्सद्दी वाटाघाटींसोबतच सर्व हितधारकांदरम्यान प्रामाणिक आणि प्रत्यक्ष भेटीतून वाटाघाटी यांचे या संघर्षाला संपुष्टात आणण्यासाठीचे महत्त्व अधोरेखित केले. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.