नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुषमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केली होती. सध्या, सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम-डीएचएम प्रायोगिक टप्प्यात लागू करण्यात आली आहे. एनएचए आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत असताना पीएम-डीएचएमचा देशव्यापी प्रारंभ झाला आहे. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, राज्यमंत्री डॉ, भारती पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेल्थ कार्ड, १४ अंकी नंबर
जन धन, आधार आणि मोबाईल (जेएएम) आणि सरकारच्या इतर डिजिटल उपक्रमांद्वारे रचलेल्या पायावर आधारित, पीएम-डीएचएम व्यापक डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या तरतुदीद्वारे एक वेगवान ऑनलाइन मंच तयार करेल. आरोग्य-संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि खासगीपणा सुनिश्चित करताना खुल्या, आंतर परिचालन, मानकांवर आधारित डिजिटल प्रणालींचा योग्य वापर करेल. मिशन त्यांच्या संमतीने नागरिकांच्या आरोग्य नोंदींमध्ये प्रवेश आणि देवाणघेवाण सक्षम करेल.
पीएम-डीएचएमच्या मुख्य घटकांमध्ये प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्राचा समावेश आहे. १४ अंकी हे ओळखपत्र म्हणजे त्याची व्यक्तीची एकप्रकारे आरोग्य ओळखच असेल. जे त्यांचे आरोग्य खाते म्हणून देखील काम करेल आणि त्याच्याशी वैयक्तिक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात. मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने हे कार्ड पाहिल्या जाऊ शकेल. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.
मिशनचा एक भाग म्हणून तयार केलेले पीएम-डीएचएम सँडबॉक्स हे तंत्रज्ञान आणि उत्पादन चाचणीसाठी एक चौकट म्हणून काम करेल जे जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा भाग बनू इच्छिणाऱ्या खाजगी कंपन्यां आणि संघटनांना मदत करेल. ते आरोग्य माहिती प्रदाते किंवा आरोग्य माहिती वापरकर्ता बनतील किंवा पीएम-डीएचएमशी कार्यक्षमतेने जोडले जातील.
हे मिशन डिजिटल आरोग्य परिसंस्थेत आंतर परिचालन क्षमता निर्माण करेल, ज्याप्रमाणे पेमेंटमध्ये क्रांतिकारी बदल करण्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेसने भूमिका बजावली होती. आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यापासून नागरिक केवळ एक क्लिक दूर असतील.
Speaking at the launch of Ayushman Bharat Digital Mission. https://t.co/OjfHVbQdT7
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2021