इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अगदी देवदूत मानणारे अनेक जण आहेत. यामुळेच देशात मोदींची अनेक ठिकाणी मंदिरेही तयार करण्यात आली आहेत. आता सूरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला होता. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवला होता. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून 18 कॅरेट सोन्यापासून 156 ग्रॅम वजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे. दागिने घडविणाऱ्या राधिका चेन्स कंपनीने ही मूर्ती तयार केली आहे. अनेकांनी ही मूर्ती खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
२० कारागिरांचा हातभार
मूर्ती घडविणारे मूळचे राजस्थानमधील बोहरा यांनी मूर्ती तयार करण्यामागील प्रवास उलगडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे. त्यांना समर्पित करण्यासाठी काहीतरी खास तयार करम्याचा विचार सुरू होता. आम्ही कारखान्यात विविध मूर्ती तयार करतो. त्यामुळे पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती तयार करण्याची कल्पना सूचली. ही मूर्ती घडविण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. 20 कारागिरांनी हातभार लावला. मूर्ती विकण्याचा विचारही केला नाही. यामुळे अद्याप किंमतही ठरली नसल्याचे ते म्हणाले.
वजन कमी घटविण्यासाठी खटाटोप
ही मूर्ती डिसेंबरमध्येच तयर झाली होती. पण, त्यावेळे वजन फारच जास्त होते. भाजपने 156 जागा जिंकल्याने तेवढेच वजन असावे, हा आग्रह होता. मूर्ती घडविण्यापेक्षाही वजन कमी करणे आव्हान होते. कारागिरांनी अनेक बदल करीत वजन कमी केले.
https://twitter.com/Manish_Rep/status/1614107163777171458?s=20&t=DveXqDQ1Agm-bH9BWvthSQ
Prime Minister Narendra Modi Gold Statue