गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदींचे दिल्लीत धरणे आंदोलन; ही आहे मागणी

by India Darpan
ऑगस्ट 2, 2022 | 7:58 pm
in राष्ट्रीय
0
Capture 3

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी आपल्या संघटनेच्या मागण्यांसाठी जंतरमंतरवर धरणे धरून बसले आहेत. ते ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन (AIFPSDF) चे उपाध्यक्ष आहेत. प्रल्हाद यांच्यासह संघटनेचे इतर अनेक सदस्यही हातात पोस्टर घेऊन जंतरमंतरवर घोषणाबाजी करताना दिसले. एआयएफपीएसडीएफचे अध्यक्ष बिश्वंभर बसू यांनी आपल्या नऊ कलमी मागण्यांबाबत पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे. बुधवारी ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रास्त भाव दुकानात तांदूळ, गहू, साखर तसेच खाद्यतेल आणि डाळींचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी AIFPSDF मागणी आहे. मोफत रेशन वितरणाचे ‘पश्चिम बंगाल रेशन मॉडेल’ देशभरात लागू करावे, अशी मागणी होत आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरसह सर्व राज्यांची थकबाकी लवकरात लवकर द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे. बसू म्हणाले, आमची मागणी आहे की स्वयंपाकाचे तेल, डाळी आणि एलपीजी गॅसचा पुरवठा रास्त भाव दुकानातूनच झाला पाहिजे. याशिवाय ग्रामीण भागातील रास्त भाव व्यापाऱ्यांनाही तांदूळ आणि गहू थेट खरेदी करण्याचा अधिकार मिळावा. ते म्हणाले की, टीएमसी खासदार सौगता रॉय यांनीही आपल्या मागण्या संसदेत मांडल्या होत्या.

प्रल्हाद मोदी रेशन दुकान चालवतात. रेशन व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रेशन डीलर्सना मिळणारे कमिशन खूपच कमी असून सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रल्हाद मोदी म्हणाले, संघटनेचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना निवेदन देणार आहे. त्यात आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या काही मागण्यांचा समावेश होतो. अलीकडच्या महागाईचा विचार करता किलोमागे 20 पैशांनी मार्जिन वाढवणे हा एक विनोदच म्हणता येईल. केंद्र सरकारने आम्हाला दिलासा द्यावा आणि या आर्थिक अडचणी दूर कराव्यात अशी आमची मागणी आहे. बुधवारी संघटनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यानंतर पुढील कृती ठरवली जाईल, असे ते म्हणाले.

Prime Minister Narendra Modi Brother Pralhad Modi Agitation Delhi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुलवामा हल्ला मिशनमधील जवानाचे निवृत्तीनंतर जंगी स्वागत; नागरिकांनी दिली अशी सलामी (व्हिडिओ)

Next Post

चौघींनी घडविला इतिहास! भारताला लॉन बॉलमध्ये मिळवून दिले सुवर्णपदक

India Darpan

Next Post
FZKKrOpakAADwzR

चौघींनी घडविला इतिहास! भारताला लॉन बॉलमध्ये मिळवून दिले सुवर्णपदक

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011