वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची आज भेट झाली. काही वेळापूर्वीच दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. मोदी यांचे भव्य स्वागत आणि व्हाईट हाऊसमधील अत्यंत दिमाखदार कारभाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसात त्यांनी विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने मोदी-बायडेन यांची भेट अतिशय महत्त्वाची आहे. आगामी काळात दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्याची अपेक्षा आहे. संरक्षण, वाणिज्य यासह विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात सामंजस्य करार होणार आहेत.
Meeting @POTUS @JoeBiden at the White House. https://t.co/VqVbKAarOV
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2021