इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी संबोधित करताना दिसतात. पण भाषण सुरू असतानाच ते अचानक थांबतात आणि बोलताना त्यांचा गोंधळ उडालेला दिसतो. ते इकडे तिकडे पाहतात. हा व्हीडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. टेलिप्रॉम्प्टरच्या तांत्रिक बिघाडामुळे पंतप्रधान बोलताना थांबले असल्याचे यातून समोर आले आहे.
पीएम मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिथे सर्व विरोधी पक्षांचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत, तिथे सोशल मीडियावर मीम्स आणि कमेंट्सचा महापूर आला आहे. नेटिझन्स या विषयावर मीम शेअर करत आहेत आणि म्हणत आहेत की पीएम मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत कारण तिथे टेलिप्रॉम्प्टर नाही.
एका मीममध्ये यूजरने केजरीवाल यांना टेलिप्रॉम्प्टरची वायर कापताना दाखवले आहे. मोहित जैन नावाच्या युजरने असा टोला लगावला की, ‘मूलं पेपरमध्ये कॉपी करत असताना शिक्षकांनी त्यांना पकडले आणि कॉपी आपल्याकडे ठेवून घेतली तर त्या पेपर देणाऱ्या मुलाचेही असेच हाल होतात.’
बघा मोदींचा हा व्हिडिओ
https://twitter.com/kapsology/status/1483124924135145474?s=20
मोहम्मद आरिफने म्हटले आहे की, ‘अब्बा, गब्बा, चब्बा म्हटले असते तरी समोरच्या व्यक्तीला समजले असते.’ दिनेश बाबूने लिहिले, ‘टेलिप्रॉम्प्टर बंद होताच आपल्यातील भारतीयांची प्रतिभा डगमगते.’ दीपक चौधरीने लिहिले आहे, ‘टेलिप्रॉम्प्टरची नोकरी आता गेली.. ‘
https://twitter.com/Midssuban/status/1483533688402964482?s=20
पीएम मोदींच्या या व्हायरल व्हिडिओवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया आली आहे. “टेलीप्रॉम्प्टरसुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही,” असे ट्विट त्यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींकडे आता काही बोलण्यासारखे उरलेले नाही. म्हणून ते टेलिप्रॉम्प्टरचा आधार घेऊन बोलतात, ज्याचा पाठीमागे कंट्रोलर असतो.
https://twitter.com/withabhinsui/status/1483377045719912449?s=20
कंट्रोलर मागून टेलिप्रॉम्प्टर कंट्रोल करतो, मग नरेंद्र मोदी बोलतात. माजी आयएएस सूर्य प्रताप सिंग यांनीही टोमणा मारला आहे, ‘टेलिप्रॉम्प्टरशिवाय सरकार बोलू शकत नाही आणि टूलकिटशिवाय भक्त. कदाचित टेलिप्रॉम्प्टरच्या तपश्चर्येतच काही कमतरता असावी.