इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना, स्वामी समर्थ केंद्र जवळ असलेल्या पार्किंग वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिक मधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधिंना बेदम मारहाण केली. पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे, किरण ताजणे यांना मारहाण झाली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या पत्रकारांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
त्र्यंककेश्वरमध्ये वृत्तांकनासाठी जात असताना इलेक्टॅानिक मीडियाच्या पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्राजवळील गाड्यांची प्रवेशाची पावती घेणा-या गुंडांकडून मारहाण कऱण्यात आली. छत्री, काठी आणि दगडाने ही बेदम मारहाण करण्यात आली. या पत्रकारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
मंत्री भुजबळ यांनी पत्रकारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांना अशी वागणूक तर पर्यटकांना काय वागणूक देणार असा सवाल केला आहे. मारहाण करणा-यांवर ताबडतोब कारवाई कारवाई झाली पाहिजे. त्याठिकाणचे पोलिस काय करत आहे. त्यांना माहिती नाही का ही लोक कोण आहेत. मीडियाची लोक एकत्र होती म्हणून ही घटना बाहेर आली. जर एखादा एकटा व्यक्ती असेल तर त्यांच्यासोबत काय होईल असे सांगून या प्रकरणाची चौकशी करावी, पत्रकारांना न्याय देऊ असे ते म्हणाले.