मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही असं राज्यपाल कोश्यारी असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहे. या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन राज्यपालकांवर टीका केली.
या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे म्हणाले की, राज्यपाल पद हे मानाच पद आहे. त्या पदाचा मान राखणे हे त्या पदावरील व्यक्तीचे काम आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी याआधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आता मुंबईबाबत असे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या नशिबी अशी लोक का आली असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही केली. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत, गड-किल्ले आहेत, पैठणीदेखील आहे. कोल्हापुरचा जोडादेखील प्रसिध्द आहे. आता राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीला कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची वेळ आहे. सामान्य माणसाने कष्टातून कोल्हापुरी जोडा कसा प्रसिध्द केला, हे दाखवण्यासाठी त्यांना हा जोडा दाखवावा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बघा संपूर्ण पत्रकार परिषद लाईव्ह…..
https://twitter.com/ShivSena/status/1553280392538468353?s=20&t=_Dz8H6vAVRypCCtkkyLHTg
Shivsena Chef Uddhav Thackeray Press Conference on Governor Koshyari Controversial Statement