विशेष प्रतिनिधी, मुंबई
मराठा आरक्षणा प्रश्नावर राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी कराव्या, राज्य सराकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, सुधारीत याचिका दाखल करण्याचा दुसरा पर्याय आहे. ३४२ अ व्दारे राज्यपालांना प्रस्ताव सादर करावा असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी यांनी सरकारला तीन पर्याय दिले. यावेळी त्यांनी ६ जूनपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ७ जूनला राजगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु असेही सांगितले. त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणी सर्व पक्षांनी एकत्र यावे असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी इतर प्रलंबित प्रश्नाकडेही लक्ष वेधले
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी छत्रपती खासदार संभाजीराजे म्हणाले की, ७० टक्के मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका आहे. यावेळी ९ आॅगस्टला दिल्लीत गोलमेज परिषद होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांनी मराठा समाजासाठी दोन दिवशीय अधिवेशन घ्यावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आमचा लढा नाही, कुठल्या पक्षाचा अजेंठा घेऊन आलो नाही. आमचा सरळ व थेट विषय आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, मी सकल समाजाच्या वतीने बोलतो आहे असे सांगत आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ आहे. मी असल्यामुळे मराठा समाज शांत आहे असेही ते म्हणाले.