लखनऊ : राजकीय नेते नेहमीच वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून देतात. अगदी एखाद्या पत्रकार परिषदेत त्यांना तिरकस किंवा वेगळाच प्रश्न विचारला तर चिडून या राजकीय लोकांनी त्याचे वादग्रस्त उत्तर दिल्याने आणखीनच वाद उत्पन्न होतो. उत्तर प्रदेशातील खासदार साक्षी महाराज हे देखील नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून करतात. आता देखील खासदार साक्षी महाराज यांनी असेच वादग्रस्त विधान केले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला साडेचार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साक्षी महाराजांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्याच दरम्यान, एका पत्रकाराने त्यांना डिझेल, पेट्रोल आणि रिफाइंड तेलाच्या वाढत्या किमतींबाबत प्रश्न विचारला. प्रश्न ऐकल्यावर साक्षी महाराज भडकले. ते म्हणाले की, लोकांचे उत्पन्न वाढले असून तुम्हाला तेल, भाजीपाला, डाळी महाग झालेले दिसतात, मात्र कधी दारू-मांसाच्या दुकानात याबाबत विचारले जाते का ? या दुकानांवर लांबच लांब रांगा असल्याचे दिसते. दारू महाग असली तरी लोक ती लाईन लावून विकत घेत आहेत. मग महागाई कुठे आहे?
एवढेच नाही तर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर त्यांनी राग काढला. याउलट साक्षी महाराजांनी मुख्यमंत्री योगी सरकारचे कौतुक केले. केंद्रातील भाजप सरकारच्या कामगिरीचे देखील कौतुक करताना ते म्हणाले की, सरकारने काश्मीरमधून ३७० हटवून ५०० वर्षांचा वाद संपवला आहे. आपला देश दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. यासोबतच ते म्हणाले की, भाजप सरकारने रस्ता बांधण्यात एक विक्रम केला आहे,