मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपा नंतर हसन मुश्रीफ यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत त्याला प्रत्युत्तर दिले. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचे फार मोठे षडयंत्र आहे. चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचाही पुर्नरउच्चार केला.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही आरोप केले, ते म्हणाले पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला असल्यामुळे ते हे कारस्थान करत आहे. भाजप भुईसपाट होण्यामागे मी कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मला पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. असेही त्यांनी सांगितले.
सोमय्या यांच्या आज केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले की, आजही सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटे आरोप केले आहे. त्यांच्या या खोट्या आरोपांमुळे त्यांची सीएची पदवी खरी आहे का ? असा प्रश्न पडतो असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रिक्स इंडिया कंपनीशी माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नसल्याचेही सांगितले.