मुंबई – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यासाठी रविवारी मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांना कराडमध्ये स्थानबध्द करण्यात आले. सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने अगोदरच आदेश दिले असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या स्थानबध्दतेनंतर विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम असून येथेच त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा महाविकास आघाडी सरकार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले.
– मुश्रीफांमुळे आंबेमातेचे दर्शन करता आले नाही
– घोटाळेबाजांना अटक करण्याएेवजी त्यांनी घोटाळा उघड करणा-यांना अटक केली.
– सहा तास घऱी व कार्यालयातून कोंडून ठेवण्यात आले, २०० पोलिस होते
– कागल पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणार होतो.
– कुठल्या आदेशाने मला गणेश विसर्जनापासून रोखलं
– मुंबई पोलिसांनी सीएसएमटी स्टेशनवर धक्काबुक्की केली
– मुंबईबाहेर जाण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
– बनावट आदेश दाखवणा-या पोलिसांवर कारवाई करा
– गनिमीकाव्याने सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो ही माहिती का लपवली
– माझ्यावर प्राणघातक कोण करणार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते की गुंड हे सांगा
– मुश्रीफांविरोधात ईडीची चौकशीच्या भीतीने कारवाई
– घोटाळे उघडकीस करण्याची फडणवीस व पाटील यांची सुचना
– उद्या नव्या घोटाळ्याबद्दल ईडीकडे व प्राप्तिकर विभागात तक्रार करणार
– कारखान्यात १०० कोटींचा मुश्रीफ यांचा घोटाळा
– आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखऱ कारखान्यांशी संबध काय
– हसन मुश्रीफांचे जावई ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक
– पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसरा घोटाळा उघड करणार