मुंबई – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आज भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी केला. गेल्या काही दिवसापासून सोमय्या यांच्या रडारवर कोणते मंत्री असणार याबाबत उत्सुकता होती. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. यावेळी त्यांनी २७ पानांचे पुरावे असल्याचा आरोप केला आहे. ही सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनी लॅान्ड्रिंगचा आरोप करत शेल कंपनीकडून मुश्रीफ यांच्या पुत्राने यांनी दोन कोटीचे कर्ज घेतल्याचेही म्हटले आहे.उद्या ईडीकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुश्रीम परिवाराने साखर कारखान्यात काळा पैसा वळता केल्याचाही आरोप त्यांनी केला.