मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द ईडीने काढलेली लूकआऊट नोटीस, करुण शर्मा पिस्तूल प्रकरण व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गर्दीवरुन विरोधकांना दिलेल्या सल्ल्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशमुख यांना चौकशीला समोर जाण्याचा सल्ला दिला. तर मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सल्ल्यावर त्यांनी समोरच्यांना बोलायचा एेवजी आपल्या पक्षातील लोकांना शिकवावे असे सांगितले. तर करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/593575525003205/