मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १७ सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर राणे यांनी त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, हायकोर्ट व महाड कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला आहे. आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहे. परवापासून सिंधुदुर्गातून जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करणार. मला अटक केलेली नव्हती, मी पोलिसांच्या विनंतीवरुन स्वत: कोर्टात गेल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यह सरकार कुछ दिनो की महेमान असेही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेना नेत्यांनीही अशी अनेक वक्तव्ये केली आहे. मुख्यमंत्री थोबाड फोडण्याची भाषा करतात त्याचे काय असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवले म्हणून बोलल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या अनेक चुकीच्या वक्तव्याचे दाखले दिले. यूपीच्या मुख्यमंत्र्याबद्दल अपशब्द वापरल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजप माझ्यामागे गंभीरपणे उभा राहिला असे सांगत आभारही व्यक्त केले.
राणे यांनी यावेळी माझ्या चांगुलपणाचा काही जण फायदा घेत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गृहखाते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे की अनिल परब ? य़ांच्याकडे असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला. अनिल परब विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते संपादक पदाच्या लायकीचे नाही, मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी ते अग्रलेख लिहितात. यावेळी कोथळा काढण्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, आयुष्यात ज्यांनी उंदीर मारला नाही ते कोथळा कसा काढणार.