मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राजभवन येथे आगमनप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवारी (दि. १ एप्रिल) रिझर्व्ह बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा होणार आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपतींचे ३१ मार्च रोजी संध्याकाळी मुंबईत आगमन झाले असून आज त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थिती राहणार आहे.