विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
येथील सफदरजंग स्थानकापासून कानपूरपर्यंत आणि नंतर लखनऊपर्यंत विशेष रेल्वेने (प्रसिडेंशिअल सुट) पराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकताच प्रवास केला आहे. आतापर्यंत तीन राष्ट्रपतींनी रेल्वेने प्रवास केला आहे. त्यात रामनाथ कोविंद यांचे नोंदवले गेले आहे. एखाद्या महालासारखी आलिशान व्यवस्था असलेल्या रेल्वेने कोणीही प्रवास करू शकतो. महाराजा एक्स्प्रेस असे रेल्वेचे नाव असून त्यात १४ बोगी आहेत. या विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी दरवर्षी चार पॅकेज लाँच केले जातात.
वेगवेगळ्या मार्गांवर ९.८३ लाख रुपयांपासून ते १८ लाख रुपयांपर्यंत खर्च करून विशेष रेल्वेने प्रवास करू शकता येतो. या रेल्वेने प्रवास करण्यासह पॅलेस ऑन व्हिलप्रमाणे प्रसिद्ध स्थळांचे पर्यटन करण्याचा या पॅकेशमध्ये समावेश आहे. सात स्टार रेटिंग असलेल्या महाराजा एक्स्प्रेसमध्ये फक्त प्रेसिडेशिंयल सुट असतो. एकूण ४४८ स्केअर फूटाच्या या सुटचे नाव नवरत्न आहे. यामध्ये अत्याधुनिक बाथरूम, सोफा, लिहिण्याचा टेबल, मिनी बार, लाइव्ह टीव्ही पाहण्याची सुविधा, वाय-फाय, डायरेक्ट डायल टेलिफोन आणि म्युझिक चॅनल्सी सुविधा असते.
विशेष रेल्वेत डिलक्स, ज्युनियर सुट आणि सुट अशा तीन श्रेणी असतात. डिलक्समध्ये २०, ज्युनियर सुटमध्ये १८, आणि सुटमध्ये एकूण चार केबिन असतात. मोती, हिरा, नीलम, फिरोजा, मोंगा आणि पुखराज अशी नावे असलेल्या १४ बोग्यांमध्ये डिलक्स क्लासमध्ये ४०, ज्युनिअर सुटमध्ये ३६, सुटमध्ये ८ आणि प्रेसिडेंशिअल सुटमध्ये चार पर्यटक प्रवास करू शकतात.
मागणीनुसार जेवण
महाराजा एक्स्प्रेसमध्ये जेवण करण्यासाठी रंगमहल आणि मयूरमहल या विशेष बोगी आहेत. त्यामध्ये चांदीच्या ताटात अन्नपदार्थ वाढतात. प्रेसिडेंशिअल सुटमध्ये लावलेल्या डायरेक्ट टेलिफोनद्वारे पर्यटक आपल्या केबिनमध्ये आवडते अन्नपदार्थ मागवू शकतो.
या चार मार्गांवर चालते महाराजा एक्स्प्रेस
दी इंडियन स्प्लेंडर ः सहा रात्र आणि सात दिवसांचा हा प्रवास दिल्लीतून सुरू होतो. त्यामध्ये आग्रा-रणथंभोर-जयपूर-बिकानेर-जोधपूर-उदयपूर या मार्गाने मुंबईपर्यंत पर्यटन करते. ही रेल्वे २७२४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.
इंडियन पॅनोरमा ः सात दिवस आणि सहा रात्रींची हा प्रवास दिल्ली येथून सुरू होऊन ती जयपूर-रणथंभोर-फतेहपूर सिकरी- आग्रा-ओरछा-खजुराहो-वाराणसी मार्गे पुन्हा दिल्लीत परतते. ही रेल्वे २३०९ किलोमीटरचा प्रवास करते.
द हेरिटेज ऑफ इंडिया ः सहा रात्र आणि सात दिवसांचा हा प्रवास मुंबई येथून सुरू होतो. उदयपूर-जोधपूर-बिकानेर-जयपूर-रणथंभोर-आग्रा मार्गे तिचा प्रवास दिल्ली येथे समाप्त होतो. ही रेल्वे २७७१ किलोमीटर प्रवास करते.
ट्रेजर्स ऑफ इंडिया ः महाराजा एक्स्प्रेसचा हा सर्वात लहान प्रवास आहे. तो तीन रात्र आणि चार दिवसांचा आहे. दिल्ली येथून सुरू होऊन ती आग्रा-रणथंभोर-जयपूर मार्गे पुन्हा दिल्लीत परतते. हा ८६० किलोमीटरचा प्रवास आहे.
प्रवासाचा खर्च
तुम्हाला प्रेसिडेंशिअल सुटमध्ये प्रवास करण्याची इच्छा असेल, तर सहा रात्र आणि सात दिवसांच्या प्रवासाच्या इंडियन स्पलेंडर, द हेरिटेज ऑफ इंडिया आणि इंडियन पॅनोरमा या वर्गात १८,०६,४२० रुपये पॅकेज आहे. चार दिवस आणि तीन रात्रींचा ट्रेजर्स ऑफ इंडियाचे पॅकेज ९.८३ लाख रुपयांचे आहे. इंडियन स्पलेंडरमध्ये डिलक्स केबिनचेृ ४.५५ लाख रुपये, ज्युनियर सुटचे ७.२१ लाख रुपये, सुटचे १०.५१ लाख रुपये पॅकेज आहे. ट्रेजर्स ऑफ इंडियाअंतर्गत डिलक्सचे २.९३ लाख रुपये, ज्युनियर सुटचे ३.७७ लाख रुपये आणि सुटचे ५.७९ लाख रुपयांचे पॅकेज आहे.
इथे करा बुकिंग
महाराजा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केली जाते. परदेशी पाहुणे अनेक महिने आधीच आपली अॅडव्हान्स बुकिंग करून अमेरिकी डॉलरमध्ये याचे पॅकेज घेतात. महाराजा एक्स्प्रेसच्या www.the-maharajas.com या संकेतस्थळावर पॅकेजचे बुकिंग करू शकतात.