नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे:-“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सर्व भगिनी आणि मुलींना हार्दिक शुभेच्छा देते.
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्तीच्या कर्तृत्वाचा आणि देश तसेच समाजासाठी त्यांनी दिलेल्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्याची एक संधी आहे. महिला आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहेत. प्रतिकूल परिस्थिती आणि आव्हानांना तोंड देत महिलांनी विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली ओळख निर्माण केली आहे.
मात्र महिलांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अजूनही बरेच काही करण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटेल आणि पुढे जाण्यासाठी समान संधी मिळेल असा समाज निर्माण करण्याचा संकल्प या निमित्ताने आपण सर्वांनी करूया.
मी सर्व यशस्वी महिलांचे अभिनंदन करते आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते .”