नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, रक्षाबंधनाच्या या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देत आहे.
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींच्या एका आगळ्यावेगळ्या बंधाचा उत्सव आहे जो प्रेमभावना आणि परस्पर विश्वासाच्या भावनेला बळकट करतो. धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक दर्शवणारा हा सण आहे. महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा आपला निर्धार बळकट करणारा हा सण आहे.
हा सण सौहार्द आणि प्रेमभावनेची जोपासना करू दे आणि महिलांविषयीचा आदर वृद्धिंगत करू दे.