सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाची तीन प्रकाशने प्रकाशित

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2024 | 2:25 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 17

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (5 नोव्हेंबर 2024) सर्वोच्च न्यायालयाची तीन प्रकाशने राष्ट्रपती भवनात प्रकाशित करण्यात आली. (i) राष्ट्रासाठी न्याय – भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश, (ii) भारतातील तुरुंग – तुरुंग पुस्तिका आणि सुधारणा आणि तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजनांची यादी, (iii) विधी विद्यालयांमार्फत कायदेविषयक मदत – भारतातील कायदेविषयक मदत देणाऱ्या कक्षांच्या कामकाजाविषयी अहवाल अशा आशयाच्या शीर्षकांची ही तीन प्रकाशने आहेत.

प्रकाशनप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की न्याय्य आणि मुक्त समाज घडवण्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना आपली न्यायदानाची व्यवस्था अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. कायदेविषयक मदतीचा अहवाल प्रकाशित होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.त्या म्हणाल्या की अशा कायदेविषयक मदत कक्षांमुळे विधी विद्यालयांमधील तरुणाईला परिपूर्ण शिक्षण मिळण्यास मदत मिळेल तसेच समाजातील दुर्बळ घटकांच्या गरजांप्रति संवेदनशीलता निर्माण होईल.

राष्ट्रपतींनी सांगितले की न्यायालयीन प्रक्रियेतून जात असलेल्या कैद्यांची स्थिती हा त्यांच्यासाठी कायम चिंतेचा विषय राहिला आहे. तुरुंग व्यवस्थाविषयक अहवालामुळे तुरुंगातील अशा कैद्यांची संख्या कमी करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका समजून घेणे शक्य होईल, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

ही प्रकाशने कायदेविषयक विनामूल्य मदत व तुरुंग सुधारणांची उद्दिष्टे आणि प्रजासत्ताकाच्या वाटचालीत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करण्यात उपयुक्त ठरतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. भारतीय सर्वोच्च न्यायालयाला महान संस्था म्हणून घडवल्याबद्दल पीठांचे आजीमाजी सदस्य आणि वकील आदी सर्वांची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बस थांब्यावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीस्वारांनी दोघा परप्रांतीय हॉटेल कामगारांना लुटले

Next Post

९० हजाराचे गळयातील सोन्याचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले…रवी शंकर मार्गावरील घटना

India Darpan

Next Post
crime1

९० हजाराचे गळयातील सोन्याचे अलंकार दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले…रवी शंकर मार्गावरील घटना

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011