इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॅानचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या पत्नी त्यांना कानशीलात लगावल्याचे दिसत आहे. मॅक्रॅान हे व्हिएतनामची राजधानी हनोई या शहराच्या दौ-यावर होते. या दौ-यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ब्रिगिट यादेखील होत्या. यावेळी विमानातून उतरतांना ब्रिगेट आणि इमॅन्यूएल मॅक्रॅान यांचा हा व्हिडिओ आहे.
विमान थांबल्यानंतर त्याचे दार उघड असतांनाचा मॅक्रानला त्यांची पत्नी ब्रिगिट कानशिलात लगावते. त्यानंतर हे दोन्ही विमानाबाहेर उतरत असतांना त्यांच्यातील विसंवाद दिसतो. मॅक्रॅान हा ब्रिगिटला हात देतो. पण, ती प्रतिसाद देत नाही. त्यानतंर ते एकटेच अभिवादन करतांना दिसत आहे.
एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सार्वजिक ठिकाणी असतांना नेमकं काय पथ्य पाळायला पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे. पण, राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या पत्नी कानशिलात लगावतात ही बातमी झाली आहे.