मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर, विरोधकांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना तिकीट दिले आहे. मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच महाराष्ट्रातून मुर्मू यांना २०० पेक्षा जास्त मते मिळतील, असा दावा भाजपने केला आहे. भाजप, शिंदे गट आणि शिवसेना यांचे मिळून १८५ आमदार आहेत. त्यामुळे २०० पेक्षा अधिक मते म्हणजे सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटणार हे स्पष्ट होत आहे. विरोधकांचे उमेदवार सिन्हा यांचा मुंबईत दौरा झाला नाही. तसेच, गेल्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आम्हाला अधिकची मते मिळाली, त्यामुळे आताही २०० पेक्षा जास्त मते मिळणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. बघा ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ChDadaPatil/status/1548910689200119808?s=20&t=NGFD75mil0PeX3COBDd45w
President Election Maharashtra Voting more than 200 votes to Murmu