मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपने राष्ट्रपती पदासाठी मूर्मू यांची निवड का केली? एका दगडात मारले अनेक पक्षी

by India Darpan
जून 22, 2022 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
draupadi murmu 1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करताना भाजपचे प्रमुख जेपी नड्डा म्हणाले की, पहिल्यांदाच एका महिला आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले आहे. ते म्हणाले, “आम्ही द्रौपदी मुर्मू यांना आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करतो.” निवडून आल्यास, 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती होणार्‍या पहिल्या आदिवासी महिला असतील.

द्रौपदी मुर्मूचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्या संथाल कुटुंबातील आहेत,  तो एक आदिवासी वांशिक गट आहे. ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू झारखंडच्या नवव्या राज्यपाल झाल्या. राजकारणी असण्यासोबतच त्या अनुसूचित जमातीच्या आहेत. राज्यपाल होण्यापूर्वी त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या. इतकेच नाही तर द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत ज्यांनी 2000 मध्ये स्थापन झाल्यापासून पाच वर्षांचा कार्यकाळ (2015-2021) पूर्ण केला आहे.

ओडिशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक मंत्री (स्वतंत्र प्रभार) होत्या. याशिवाय 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 पर्यंत त्या मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.

मुर्मू यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली आणि नंतर ओडिशाच्या राजकारणात प्रवेश केला. त्या भाजपच्या तिकीटावर मयूरभंज (2000 आणि 2009) मध्ये रायरंगपूरमधून दोन वेळा आमदार होत्या. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुर्मू या 2013 ते 2015 या काळात पक्षाच्या एसटी मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होत्या. त्यांनी 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याच वर्षी भाजपच्या एसटी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवून भाजपने एका बाणात दोन निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार असल्याने भाजपने आदिवासींवर लक्ष केंद्रित केले आहे. या राज्यांमध्ये आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पक्षाच्या नियोजनासाठी आदिवासी मतदार अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासोबतच 64 वर्षीय द्रौपदी महिला मतदारांना आकर्षित करण्यात पक्षाला मदत करू शकतात.

president election bjp nda candidate Draupadi Murmu selection reason

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने आणली ही सुधारित योजना

Next Post

अदानींचा मोठा डाव! विकत घेतल्या या दोन कंपन्या असा होणार फायदा

India Darpan

Next Post
gautam adani

अदानींचा मोठा डाव! विकत घेतल्या या दोन कंपन्या असा होणार फायदा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011