काबूल – अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. तालिबान्यांनी आक्रमकपणे विविध शहरांवर कब्जा मिळविण्याचा सिलसिला सुरू केला आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलपर्यंत तालिबान्यांनी धडक दिली आहे. अफगाणिस्ताचे राष्ट्रपती अशरफ गनी हे लवकरच त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अफगाणिस्तानातून पलायन केले असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील वृत्त अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिले आहे. तालिबान्यांनी वाढविलेल्या दबावाला ते बळी पडल्याचेही बोलले जात आहे. आता पुढे काय होणार, तालिबानी अफगाणिस्तानावर पूर्णपणे वर्चस्व मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.