मुंबई – केंद्र सरकारने आता मोबाईल सिम कार्डबाबत नवीन कनेक्शन मिळवण्याची किंवा प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमध्ये प्रीपेडमध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. यासाठी आता पूर्वीप्रमाणे कोणताही प्रत्यक्ष जाऊ फॉर्म भरण्याची गरज नाही. तर टेलिकॉम कंपन्या हा फॉर्म डिजिटल पद्धतीने ग्राहकांना घरी बसून करू शकतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिलेल्या निर्णयाबाबत पीआयबीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सदर योजना ई-केवायसी अॅपवर आधारित असेल. म्हणजेच, ग्राहकाला संबंधित कागदपत्रे सेवा प्रदात्याच्या अॅपवर अपलोड करावी लागतील, त्या आधारावर केवायसी केले जाईल. सेल्फ केवायसीसाठी ग्राहकाला फक्त १ रुपये द्यावा लागले.
सध्याच्या नियमांनुसार, जर एखादा ग्राहक आपला प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमध्ये प्रीपेडमध्ये बदलतो, तर त्याला प्रत्येक वेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण आता केवायसी फक्त एकदाच करायचे आहे. केवायसीसाठी कंपनी ग्राहकांकडून काही कागदपत्रे मागते. यापूर्वी हे काम स्वतः ग्राहक सेवा केंद्रात जाऊन करायचे होते. परंतु आता आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कागदपत्रे अपलोड करून हे ग्राहक स्वतः करू शकतो.
सेल्फ केवायसी हे वेबसाइट किंवा अॅप्लीकेशनद्वारे केले जाऊ शकते. सेल्फ केवायसीसाठी, प्रथम फोनमध्ये सिम प्रदात्याचा अॅप्लीकेशन डाउनलोड करा. यानंतर, आपल्या फोनवर नोंदणी करावी लागेल आणि पर्यायी क्रमांक द्यावा लागेल, यानंतर आपल्याला वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. यानंतर लॉग इन करून सेल्फ केवायसीचा पर्याय निवडावा लागेल, त्यामध्ये विनंती केलेली माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.