इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्युब यासारख्या माध्यमातून अनेक गोष्टींची देवाणघेवाण होते. आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. विशेषतः युट्युबवर बघून बघून महिला किचनमध्ये वेगवेगळ्या रेसिपी शिकत असतात. त्याचप्रमाणे तरूण देखील युट्युब मध्ये नवनवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशाप्रकारे माहीत नसलेल्या गोष्टी शिकत असताना त्यामध्ये धोका देखील संभवतो कारण त्यातून काहीही घडू शकते अशाच प्रकारची धक्कादायक घटना तामिळनाडूती घडली. एका इसमाने युट्युब बघून त्याप्रमाणे आपल्या पत्नीची घरच्या घरी डिलिव्हरी तथा बाळंतपण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये थोडीशी चूक झाल्याने महिला त्या महिलेला रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पतीविरोधात गुन्हा दाखल
कृष्णागिरी जिल्ह्यामध्ये पोचमपल्लीनजीक पुलियामपट्टी येथे ही धक्कादायक घटना घडली. याठिकाणी राहाणारी लोगनयाकी (२७ वर्षे) या महिलेचा घरीच डिलिव्हरी करताना मृत्यू झाला. कारण पतीने युट्युबवर पाहून घरीच डिलिव्हरी कशा पद्धतीने करायची याची माहिती गोळा केली होती. पण त्याच्या या धाडसी निर्णयामुळे त्याच्या पतीला आपला जीव गमवावा लागला. लोगनयाकीचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनीच पोलिसांना दिली होती. घरीच डिलिव्हरी केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला.
रुग्णालयात नेले नाही
पूर्वी ग्रामीण भागामध्ये दाई नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी महिलांचे बाळंतपण तथा डिलिव्हरी करीत असत. आता सर्व बाळांतपणे रुग्णालयातच होतात. कारण यामध्ये धोका उद्भवू शकतो या इसमाने मात्र घरच्या घरी तो प्रयत्न केल्याने याप्रकरणी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला अधिकारी यांनी सांगितले की, लोगनयाकी ही स्त्री गरोदर होती. तिला प्रसववेदना सुरु झाल्याने तिने पती मधेशला रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितले. पण मधेश तिला पती रुग्णालयात घेऊनच गेला नाही. त्याने घरीच पत्नीची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. युट्युबवर पाहून त्याने नैसर्गिक पद्धतीने पत्नीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला.
ही झाली चूक
लोगनयाकीने बाळाला जन्म दिला. मात्र गर्भनाळ कापताना मधेशकडून चूक झाली. त्यामुळे अति रक्तस्राव होऊ लागल्यामुळे लोगनयाकी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात पोलिसांना काही पुरावे सापडले तर आरोपी पतीला अटक होण्याची शक्यता आहे.
Tried to deliver wife at home after watching YouTube
Pregnant Wife Delivery Husband Watching YouTube Video
Tamil Nadu Death Home Crime Krishnagiri