वॉशिंग्टन – गर्भवती महिलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आहे की नाही याचा खुलासा झाला आहे. आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, गर्भवती महिला ही लस घेऊ शकतात.
गर्भधारणेदरम्यान महिला अँटी कोविड -१९ लस घेण्यास आणि पूरक आहार घेण्यास सुरक्षित असतील, तसेच गर्भधारणेसंबंधी कोणतेही आजार किंवा नुकसान झाल्याचा पुरावा नाही, असे प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे.
या अभ्यासपूर्ण लेखात अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक जेफ्री गोल्डस्टीन यांनी म्हटले आहे की, गर्भधारणेच्या काळात नाभी हा विमानातल्या ब्लॅक बॉक्ससारखा आहे. गर्भधारणेदरम्यान काही गडबड झाली असेल तर प्लॅसेंटामध्ये बदल पाहू शकतो, त्यामुळे काय झाले हे माहित होऊ शकते. कोविड -१९ ची लस घेतल्यास नाभीसंबधीची हानी होत नाही.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक आणि अभ्यासाच्या सह-लेखक एमिली मिलर म्हणाल्या की, लसीबद्दल गर्भवती महिलांमध्ये अनिच्छेची भावना आहे. परंतु आमच्या संशोधन गटाला आशा आहे की, लेखातील जनजागृतीमुळे गर्भधारणेदरम्यान लसीकरण होण्याच्या धोक्याबद्दल चिंता कमी होईल. शिकागो, यू.एस. मधील लसीकरण केलेल्या गर्भवती महिलांसंबंधी चाचणी केली. यातील बहुतेकांना गर्भधारणेच्या सातव्या ते नवव्या महिन्यात मोडर्ना आणि फायझर लस डोस देण्यात आला होता.