इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील एका सामूहिक विवाह सोहळ्यात दोनशे तरुणींची लग्नापूर्वी प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत हा सोहळा होत असल्याने सरकारच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.
मध्यप्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील गदासराय गावात मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा कार्यक्रम झाला. यावेळी सोहळ्यात सहभागी झालेल्या दोनशे तरुणींची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली. सुरुवातीला त्याबद्दल कुणीच बोलले नाही. परंतु, काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला आणि मध्यप्रदेशातील भाजप सरकारला धारेवर धरले. त्यामुळे या विषयाची देशपातळीवर गंभीर दखल घेतली जात आहे.
गरिबांचा अपमान असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात दिंडोरीचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांनी प्रशासनाकडून अश्याप्रकारच्या कुठल्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या, असे स्पष्ट केले आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी वधुंची अॅनिमिया चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, वैद्यकीय चाचणीदरम्यान काही वधुंनी स्त्रीरोगासंदर्भात तक्रारी केल्या. त्यामुळे त्यांच्या प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आल्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या विवाह सोहळ्यात एकूण २१९ जोडप्यांचे विवाह निश्चित झाले होते. त्यातील २०० वधुंची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केला आहे. मध्यप्रदेशातील तरुणींचा हा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या योजनेंतर्गत पात्र जोडप्यांना सरकारकडून ५६ हजार रुपयांची मदत देण्यात येते.
चार महिला गर्भवती
प्रशासनाकडून वधुंच्या अॅनिमिया टेस्टच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी स्त्रीरोगासंदर्भात काहींनी तक्रारी केल्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात आली. त्यात चार वधु गर्भवती असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना विवाहाची परवानगी नाकारण्यात आली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली आहे. २०० वधुंची प्रेग्नन्सी टेस्ट झाल्याची माहिती खरी असेल तर कुणाच्या आदेशावरून हे घडले, असा सवालही त्यांनी केला आहे.
डिंडोरी में मुख्यमंत्री कन्यादान योजना के तहत किए जाने वाले सामूहिक विवाह में 200 से अधिक बेटियों का प्रेगनेंसी टेस्ट कराए जाने का समाचार सामने आया है।
मैं मुख्यमंत्री से जानना चाहता हूं कि क्या यह समाचार सत्य है? यदि यह समाचार सत्य है तो मध्यप्रदेश की बेटियों का ऐसा घोर अपमान…— Kamal Nath (@OfficeOfKNath) April 23, 2023
Pregnancy Test of Girls before Community Wedding