नाशिक – अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अज सादर करण्याचे आवाहन आवाहन पुणे शिक्षण संचालनालय (योजना) चे शिक्षण संचालक, कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १ ली ते १० वी साठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती तर इयत्ता ९ वी ते १० वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना शिक्षण संचालनायल मार्फत राबविण्यात येतात. या सर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांना एनएसपी २.० पोर्टलच्या www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच नुतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती योजनांच्या अधिक माहितीसाठी एनएसपी २.० पोर्टलच्या www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.