इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात सिलेंडरच्या स्फोटामुळे तंबूत आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये २० ते २५ तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीनंतर अग्नीशामक दलांच्या गाड्यांना पाचरण करण्यात आले. त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. विवेकानंद समितीचा एक टेंट होता. या टेंटला आग लागली नंतर ही आग पसरल्यामुळे आजबाजूच्या टेंटला सुध्दा आग लागली.
शास्त्री नगर ब्रिज सेक्टर १९ परिसरात रेल्वे पुलाच्यामध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि पोलिस दलाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. येथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.