टोकियो – पॅरॉलिम्पिकमध्ये भारतीय पथकाकडून पदकांची लयलूट सुरूच असून, शुक्रवारी उंच उडी टी ६४ प्रकारात प्रवीण कुमार याने रौप्यपदक पटकावले आहे. या पदकासह भारताच्या खात्यात आता ११ पदके आली आहेत. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम अॅडवर्डस आणि प्रवीण कुमारमध्ये सुवर्णपदकासाठी चुरशीची लढत झाली. प्रवीणने २.०७ मीटरची उडी मारून आशियाई विक्रम स्वतःच्या नावावर केला. अंतिम पदकासाठी अॅडवर्ड्सने २.१० मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकावले. तर प्रवीणला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय अॅथलिट मरिअप्पन थंगवेलूने उंच उडी प्रकारात पौप्यपदक पटकावले. मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळविणार्या मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. याच प्रकारात शरद कुमारने कांस्यपदक मिळविले. या विजयासह पॅरॉलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात अकरा पदांची नोंद झाली आहे. आतापर्यंत भारताने दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके पटकावली आहेत. अवनी लेखराने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत तसेच सुमीत अंतिलने ६८.५५ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.