इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे एका टोळक्याने हल्ला केला. यावेळी त्यांच्यावर शाईफेक आणि वंगणाचे तेल ओतण्यात आले. यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेह-याचा संपूर्ण भाग वंगण तेलाच्या काळ्या रंगाने माखून गेला.
या घटनेनंतर आता त्यावर तीव्र सामाजिक व राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशारितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध असे सांगितले.
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. याच प्रवीण दादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला तेही बहुजन वर्गाचे. त्रयस्थ यात मजा घेत आहेत. भावांनो. मला फक्त एक प्रश्न आहे, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलले होते, तो प्रशांत कोरटकर शिवयारांबद्दल बोलला होता तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते ?
तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुरोगामी विचारधारेचे पाईक,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी आता बोलायचच नाही,त्यांच्या नेत्यांनी विरोधाचा आवाज काढायचाच नाही,यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. पण प्रवीण दादा आणि त्यांच्यासारखे लाखो पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत..! आम्ही प्रवीण दादांच्या सोबत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध असे म्हटले आहे.