योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
संपूर्ण राज्यात प्रती गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोउत्सव रविवार दि १२ रंगपंचमी पासून सुरु होत आहे. दत्त मंदिर संस्थान आणि ग्रामपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. याठिकाणी सप्तरंगात दत्त पालखी सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून महानुभाव पंथीय भाविक दाखल होत आहेत.
श्री क्षेत्र मौजे सुकेणे हे महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थ स्थळ असून याठिकाणी चक्रधर स्वामींचा एक दिवसाचा मुक्काम होता . या यात्रेला पेशवे कालीन परंपरा असून दत्त प्रभू पालखीपुढे उधळणारा रंग हा प्रसाद म्हणून भाविक अंगावर घेतात . अशी येथे श्रद्धा आहे- पाच दिवस चालणार्या या यात्रेत संपूर्ण देश महानुभाव पंथीय भाविक सहभागी होतात. याठिकाणी विडा अवसर , नारळ, हि पूजा देवाला भाविक आवर्जून वाहतात व नवसपूर्ती करतात.
यात्रेत रेवडी, गुढी पाडव्याचे गोड हार कडे, गोडीशेव , जिलेबी याची मोठ्या प्रमाणात विक्री होते- देशभरातील महानुभाव पंथियांचे प्रमुख चरणांकित स्थान असलेले मौजे सुकेणे यथील एकमुखी जिल्ह्यातील मोठा यात्रौत्सव म्हणून ओळख असलेल्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून आज शनिवारी दि ११ रोजी राज्याच्या विविध भागातून भाविक व यात्रेकरू श्रीक्षेत्र मौजे सुकेणेत डेरेदाखल झाले आहेत- मौजे सुकेणे ग्रामपंचायतीच्या वतीने असून यात्रेकरू भाविकांना जागा , पाणी , व्यवस्था तसेच बाणगंगा नदी पात्राची स्वच्छता करून दरवर्षीप्रमाणे नदीपात्रातही रहाट पाळणे , व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात अशी माहिती उपसरपंच सचिन मोगल यांनी दिली.
दत्त मंदिर संश्थानाच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिराला रंगरंगोटी, विदयुत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. यात्रेत जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महंत मनोहरशास्री सुकेणेकर , पूज्य अर्जुनराज सुकेनेकर,पूज्य बाळकृष्णराज सुकेणेकर , पूज्य राजधरराज सुकेणेकर यांनी दिली. बाणगंगा नदी पात्र , कसबे सुकेणे बसस्थानक पर्यंत व्यावसायिक डेरेदाखल झाले असून मौजे व कसबे सूकेणेचा परिसर गजबजला आहे. यात्रेसाठी बाणगंगा नदीपात्रात यंदाही मोठमोठी आकाश पाळणे दाखल झाली आहे- चार दिवसांच्या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असते- राज्यभरातून व्यवसायिक डेरेदाखल झाले असून सुकेणेत चैतन्य पर्व निर्माण झाले आहे-
सप्तरंगांची होणार उधळण
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखी पुढे रंगांची होणारी उधळण आणि भाविकांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो . सुमारे दिड ते दोन लाख भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होतात. सुमारे तेरा तास हा सोहळा रंगपंचमी च्या दुपार पासून ते दुसर्या दिवशी पहाटे पर्यंत हा सोहळा रंगात रंगतो . हे विशेष व खास आकर्षण आहे-
सुकेणे यात्रेत रंगपंचमीला मोठे महत्व असून या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून दत्त मंदिर संस्थानाने पोलीस, ग्रामपंचायत , प्रशासन यांच्या मदतीने विविध पातळीवर जय्य्त तयारी केली आहे- भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व यात्रौउत्सव उत्साहात पार पाडावा
– पूज्य अर्जुनराज सुकेणेकर , दत्त मंदिर
Pratigangapur Mauje Sukene Datta Palkhi Sohala Mahanubhav Pantha Temple
Nashik Niphad