इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबण्यात आले होते. अर्धा तासानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आले. गेटवर अडवल्यानंतर प्रतिभा पवार चांगल्याच संतापल्या. टेक्सटाईल पार्कच्या खासदार सुनेत्रा पवार अध्यक्ष आहेत.
प्रतिभा पवार म्हणाल्या, ‘तुम्ही गेट का बंद केले? आम्हाला पाहून गेट बंद केले का? तुम्हाला कुठून फोन आला? कोणाचा फोन आला? आतमध्ये सगळे सुरू आहे की बंद आहे? आतमध्ये सगळे सुरू आहे, तर मग अडवत का आहात? आम्ही चोरी करायला थोडीच आलो आहोत. आम्हाला इथे खरेदी करायची आहे. ज्यांनी बंद करायला सांगितले आहे. त्यांना सांगा आम्हाला खरेदी करायची आहे.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की माझी आई प्रतिभा पवार माझी मुलगी रेवती सुळे या दोघी बारामतीतल्या टेक्सटाइल पार्कमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना अर्धा तास थांबून ठेवण्यात आल्याची मला माहिती कळाली आहे. ज्या शरद पवारांनी बारामतीत हे पार्क उभे केले, त्या शरद पवारांच्या पत्नीला अर्धा तास त्या ठिकाणी थांबवलं जाते. आता सत्ता आहे म्हणून हे ठीक आहे, ते लोकांना कसेही वागवू शकतात.
दरम्यान, अर्धा तास वाट पाहिल्यानंतर प्रतिभा पवार यांना बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटमधून आत सोडण्यात आले आहे. ‘सीईओं’चा फोन आल्याने मी गेट बंद केले असल्याचे स्पष्टीकरण सुरक्षा रक्षकाने दिले आहे.