मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीजदर विषयी सातत्याने लढा देणारे गाढे अभ्यासक “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज”च्या वीजदर विषयक समितीचे चेअरमन प्रतापराव होगाडे यांचे आज १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विजय सागर यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना म्हटले की, वीज ग्राहक हक्कासाठी कायम धडाडीने लढणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या जाण्याने वीजदर विषयक ग्राहकांच्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे. सर्व विजग्राहक त्यांचा हा लढा पुढे सुरू ठेऊन त्यांना खरी श्रद्धांजली वाहूयात।