मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यातील वाई – महाबळेश्वर नजिक असलेल्या प्रतापगडाच्या परिसरात आता अफजल खानाच्या वधाचा देखावा उभारून त्यावर हा साऊंड अॅन्ड लाईट शो प्रस्तावित आहे. या संदर्भात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली असून संबंधित सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
लोढा यांनी पत्रात दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या निमित्ताने आणि हिंदू एकता आंदोलन सातारा व इतर संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, शिवप्रताप स्मारक उभारण्याचा, लाईट अॅन्ड साऊंड शो सुरू करण्याचा बाबत प्रस्ताव मागवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहे. दि.१० नोव्हेंबर रोजी यंदाचा शिवप्रताप दिन झाला आहे. तसेच किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर तोडून प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून रातोरात या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींकडून होत असलेल्या मागणीवर सरकारने कार्यवाही केली. सरकारने उचललेल्या या पाऊलाचं शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान, या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. त्या काळात आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान याने छत्रपती शिवाजी महाराजांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच सावधान झालेल्या शिवरायांनी जागीच वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला.
अफजल खानाचा कोथळा काढून त्याला यमसदनी पाठवले होते. याप्रसंगी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे, तसेच आजही शिवभक्तांना ही घटना प्रेरित करत असते.
पर्यटनमंत्री लोढा यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, त्यानंतर आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे, असे लोढा यांनी ट्वीट करत सांगितले आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीन शतक पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) (@MPLodha) November 15, 2022
Pratapgad Light and Sound Show Tourism Department
Historic Shivaji Maharaj