इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणा-या आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणा-या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये कोरटकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ११ मार्चला होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरटकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन ही धमकी देण्यात आली होती. ही धमकी दिल्यानंतर कोरटकर फरार होता. पोलिसही त्याचा शोध घेत होते.
काल कोरटकर यांच्या पत्नीने त्यांना धमक्या येत असल्याची तक्रार दिली होती. त्यात कुटुंबाची बदनामी होत असल्याचे म्हटले होते. धमक्याबद्दल कुठल्याही व्यक्ती किंवा घटनेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली पण, कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही.