नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि ज्योतिष अभ्यास मंडळाचे शिक्षक श्री प्रशांत चौधरी यांच्या मातोश्री कै सौ सुनिता सुधाकर चौधरी यांचे निधन झाले. त्यांचे वय ६९ वर्ष एवढे होते. त्यांचा दशक्रिया विधी २१ जुलै रोजी रामकुंड, पंचवटी येथे होणार आहे.
इंडिया दर्पणमध्ये नियमित लेखन करणारे, वास्तू शंकासमाधानसह विविध बाबीत मार्गदर्शन करणारे आणि दररोज हजारो जणांना दैनंदिन राशिभविष्य सांगणारे ज्योतिषाचार्य प्रशांत चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवीन सिडको, राणा प्रताप चौक येथील रहिवाली आणि विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते सुधाकर चौधरी यांच्या पत्नी कै सौ सुनिता यांचे निधन झावे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे.