मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे तत्कालीन महसूलमंत्री कर्मवीर भाऊसाहेब हिरे, माजी शिक्षण, ऊर्जा, आरोग्य अशा विविध कॅबिनेट मंत्रीपदे भूषविणाऱ्या स्वर्गीय डॉ. बळीराम हिरे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या प्रसाद हिरे आणि त्यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे बळ मिळणार असून या भागाच्या विकासाला देखील अधिक गती मिळणार आहे, असे उदगार भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत प्रसादबापू हिरे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गीतांजलीताई हिरे, युवानेते प्रणवदादा हिरे, युवानेत्या प्रांजलीताई हिरे आणि त्यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आज पार पडला.
भाजपच्या माध्यमातून जनसेवेसाठी कटीबद्ध : प्रसाद हिरे
मालेगावसह संपूर्ण जिल्ह्याचा विकास व्हावा आणि सर्वसामान्यांची कामं व्हावीत याच प्रामाणिक भावनेने देशातील सर्वात मोठया असलेल्या. भारतीय जनता पक्षात आज पुन्हा सहभागी होत असताना मनस्वी आनंद होत आहे. आपण भाजपमध्ये कोणत्याही पदासाठी मी सहभागी झालेलो नाही. सर्वसामान्यांची कामे व्हावीत, कार्यकर्त्यांची कामे व्हावीत, व्याघ्र संवर्धन आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून वन्य जीव आणि निसर्ग संवर्धन कार्यासाठी पाठबळ लाभावे, इतकीच आपली प्रामाणिक भावना आहे. लोकांची कामे करून त्या माध्यमातून जनसेवेसाठी मी भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. किंबहुना ही आपली “घर वापसी” चं आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही देत आपल्या एका शब्दावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करण्याऱ्या हजारो कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, अशी भावना प्रसादबापू हिंरे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रदेश मीडिया सेलचे प्रमुख नवनाथ बंग यांनी सूत्रसंचलन केले.
प्रसादबापू हिंरे यांच्याविषयी थोडक्यात…
प्रसाद हिरे हे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नातू आणि माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे आणि इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका इंदिराताई हिरे यांचे चिरंजीव आहेत. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, मालेगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी विविध पदे भूषविली आहेत. कै. भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मालेगाव तालुका शेतकरी सहकारी स्टार्च फॅक्टरी, डॉ. बी. व्ही. हिरे हायटेक टॅक्सटाईल कस्टरचे चेअरमन आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपकडून विधानसभा, विधान परिषद निवडणूक लढवली आहे.
हिरे यांच्या नेतृत्वाखाली यांचा झाला पक्ष प्रवेश
प्रसाद हिरे यांच्या नेतृत्वाखाली आर्कि. निनाद वैद्य, आर्कि. प्रथमेश पंडित ( मुंबई ), मयुरेश दशरथ शेवाळे ( ठाणे ), देवेंद्रसिंग शेखी, बाजीराव रामचंद्र निकम, मयूर अमृत निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र पोपटराव लोंढे, सतिष बुवाजी पाटील, समाधानदादा हिरे, मनोज हिरे – पाटील, सावळीराम अहिरे, वाय. के. खैरनार, जितेंद्रसिंह ठाकूर, प्रकाश तमखाने, मिहीर नानल, सुरेश बच्छाव ( सेवानिवृत्त पीएसआय ), भाऊसाहेब वाघ, संदीप शिरसाट, अजित लाठर, पदमाकर पाटील, प्रसाद खैरनार, बबन पवार, विजय हिरे, दीपक अहिरे, साहेबराव हिरे, डॉ. मनोज हिरे, संजय हिरे, भरत हिरे, बबनराव बच्छाव, बाबुलाल बच्छाव, रमेश बच्छाव, उत्तम बच्छाव, वाल्मीक सोनवणे, सुरेश कापडणीस, भाऊसाहेब भामरे, बापू खैरनार, नंदु गवळी, दादाजी भदाने, निवृत्ती आहिरे, नानाभाऊ पठाडे, मनोज भामरे,पंढरीनाथ पितृभक्त, अनिल देसले, शालिग्राम श्यामसिंग तवर, निंबा संसारे, पोपट संसारे, आनंदसिंग वाघ, डॉ. तेजराज देवरे, गिरीधर पाटील, सुनील पवार, लहू पवार, अशोक पगार, सागर रघुनाथ बोरसे, भिला पाटील, दिनेश सोनवणे, राजेंद्र बोरकर, संतोष कचवे, उत्तम कचवे, दीपक गुरव, जगन चौधरी, सुरेश शिरोळे, प्रभाकर ठाकरे, धर्मा सैंदाणे, सुरेश वाघ, किरण पगारे, शांतीलाल शेलार, प्रकाश शेलार, भिका धुमा वाघ, सुभाष पवार, राजेंद्र घरटे, सुनील खैरनार, रामदास खैरनार, संतोष खैरनार, बाळू ठाकरे, वाल्मीक अहिरे, सुदाम जाधव, भूषण ह्याळीज, काशिनाथ अहिरे, ज्ञानेश्वर अहिरे, भिकन बच्छाव, नाना खैरनार, वाल्मीक सोनवणे, रावसाहेब देवरे, शिवाजी गवांदे, जयसिंग जाधव, मांगीलाल पवार, रमेश हिरे, भगवान संतोष निकम, अशोक पवार, विवेक हिरे, अभिमन तुकाराम खरे, अरुण शिंदे, सागर शिंदे, सर्जेराव शिंदे, विलास निकम, सुभाष खैरनार, एकनाथ पुंडलिक शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, जिभाऊ सूर्यवंशी, बापू सोनवणे, इत्यादी हजारो कार्यकर्त्यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला.
जल्लोष्यात स्वागत
भाजपचे नेते महेश हिरे, नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक पवार, दादा जाधव, विद्यमान अध्यक्ष निलेश कचवे, लकी गिल, कमलेश निकम, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, नितीन पोफळे, अरुण माऊली, श्याम गांगुर्डे आदींनी प्रसाद बापू हिरे यांच्या पक्ष प्रवेशाचे यावेळी जल्लोषत स्वागत केले आणि त्यांचा सत्कार केला.