शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन चाचण्या यशस्वी

by Gautam Sancheti
जुलै 29, 2025 | 7:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
image00184KP

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल 28 आणि आज 29 जुलै, 2025 रोजी ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्र उड्डाणाच्या सलग दोन यशस्वी चाचण्या घेतल्या. या क्षेपणास्त्र प्रणालीचा कमाल आणि किमान पल्ला क्षमता निश्चित करण्यासाठी ‘वापरकर्ता मूल्यांकन’ चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्यूएशन) भाग म्हणून या उड्डाण चाचण्या घेण्यात आल्या. क्षेपणास्त्रांनी अचूकपणे इच्छित मार्गाचे अनुसरण केले आणि चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करून अगदी सूक्ष्‍मातील सूक्ष्‍म अचूकतेसह लक्ष्य बिंदू गाठला. प्रलय उपग्रहाच्या उपप्रणालीने अपेक्षेनुसार सर्व कामगिरी पार पाडली. यासंबंधी पडताळणी एकात्मिक चाचणी श्रेणी (आयटीआर) द्वारे तैनात केलेल्या विविध ‘ट्रॅकिंग सेन्सर्स’ द्वारे ग्रहण केलेली चाचणीचा डेटा म्हणजे माहिती वापर करून करण्यात आली. ज्यामध्ये नियुक्त केलेल्या प्रभाव बिंदूजवळ असलेल्या जहाजावर तैनात केलेल्या उपकरणांचा समावेश आहे.

प्रलय हे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले ‘सॉलिड प्रोपेलेंट क्वासी-बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र आहे, जे उच्च अचूकता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मार्गदर्शन आणि दिशादर्शन वापरते. हे क्षेपणास्त्र विविध लक्ष्यांचा अचूक भेद करण्‍यासाठी अनेक प्रकारची ‘वॉरहेड’ म्हणजे युध्‍दासाठी वापरावयाची साधने वाहून नेण्यास सक्षम आहे. ही प्रणाली आरसीआय म्हणजेच रिसर्च सेंटर इमारतने इतर डीआरडीओ प्रयोगशाळांच्या सहकार्याने विकसित केली आहे यामध्‍ये संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना, उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, संरक्षण धातुकर्म संशोधन प्रयोगशाळा, टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा, संशोधन आणि विकास स्थापना (अभियंते) आणि आयटीआर इत्यादींचा सहभाग आहे. तसेच या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्‍ये – भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इतर अनेक उद्योग आणि एमएसएमईंचा सहभाग आहे.

‘प्रलय’ च्या उड्डाण चाचण्यांचे डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करातील वापरकर्त्यांचे प्रतिनिधी तसेच उद्योग प्रतिनिधी यांनी निरीक्षण केले.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, सशस्त्र दल आणि संबंधित उद्योगांचे कौतुक केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे क्षेपणास्त्र शत्रूच्या धोक्यांविरुद्ध सशस्त्र दलांना अधिक तांत्रिकदृष्ट्या बळ देईल, असे ते म्हणाले.

संरक्षण संशोधन आणि विकास सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी ‘प्रलय’ निर्माण करणा-या टीमचे अभिनंदन केले आणि सांगितले की, या टप्प्यातील पहिल्या उड्डाणाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे नजीकच्या भविष्यात सशस्त्र दलांमध्ये या प्रणालीचा समावेश होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओने लॉन्च केला एआय रेडी क्लाउड कॉम्प्युटर…टीव्ही स्क्रीनला स्मार्ट पीसीमध्ये करा रूपांतरित

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत दिली ही माहिती….(बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल… अनेक मार्गावर वाहतुकीत बदल

ऑगस्ट 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
Next Post
Untitled 57

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत दिली ही माहिती….(बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011