नाशिक – येथील बी.वाय.के. कॅालेजच्या माजी प्राध्यापिका श्रीमती सुलभा चंद्रकांत जामदार लिखीत ‘ज्ञानमाऊली’ व ‘पाच संतरत्ने’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन अर्थतज्ञ व लेखक डॅा.विनायक गोविलकर यांच्या शुभहस्ते पार पडले. कुसूमाग्रज प्रतिष्ठान येथे शनिवारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात व लेखक डॅा. यशवंत पाटील व संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहू (महाराज) खैरे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्वबोध पब्लिकेशन अॅण्ड प्रॅाडक्शन या प्रकाशनातर्फे ही दोन्ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. अमोल जामदार, वैशाली राकेश शाह, हेमंत गुजराथी, सिध्दार्थ गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. मयुरी गुजराथी, गौरी जामदार आणि अंकिता गुजराथी यांनी या कार्यक्रमाचे सुञसंचालन केले.