इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. या राजीनाम्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण, त्यांनी आज अचानक राजीनामा दिला व नाराजी सुध्दा व्यक्त केली.
हा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी एक समान्य प्रवक्ता म्हणून तिथे होतो. माझ्यावर जेवढी जबाबदारी होती, तेवढी मी चांगल्या रितीने पार पडली. पण, गेल्या काही दिवसात मला वाटू लागलं की आता कुठे थांबल पाहिजे म्हणून मी थांबण्याचा निर्णय़ घेतला. कधीकधी आपल्याला या वयात लक्षात आलं नाही तर काय उपयोग. आता आपली गरज तिथे फारशी राहिलेली नाही. काही गोष्टी मध्यतंरी घडल्या. त्या सगळ्या लोकांना माहित आहेत. म्हणून मी फक्त जर मनसेत अपराधी असेन तर फक्त अमित ठाकरेंच्या बाबतीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोललो की, अमितची मी तुमच्यासोबत, तुमच्या मुलासोबत काम करेन, मनुष्य एक विचार करतो नशीब काही दुसच ठरवतं असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतांना त्यांनी आपली भूमिका मांडली होती.