इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्टी देत मनसेला रामराम केला. इगतपुरीच्या मनसेच्या शिबिरात बोलावले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी हा राजीनामा दिली आहे. यावेळेस त्यांनी राजकारणातील निवृत्ती सुध्दा जाहीर केली.
जिथं सन्मान नाही तेथे राहण्यात काय अर्थ असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राणेंविरुद्ध लढलो, पण पक्षाकडून मदत नाही, घरातच मान नाही तर आता बस झालं असेही त्यांनी सांगितले. मी कुणावर नाराज नाही असेही त्यांनी सांगितले. विठ्ठल बदलणार नाही. पण, बोलावल्याशिवाय जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
मनसेचं सध्या नाशिकच्या इगतपुरी येथे कार्यकर्ता शिबिर सुरु आहे. पण या शिबिरासाठी प्रवक्ते प्रकाश महाजन यांना मात्र डावलण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड नाराज झाले.