लासलगाव- मराठी भाषा सल्लागार समीतीच्या सदस्यपदी कवी, गीतकार प्रकाश होळकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
आज दिनांक ३० डिसेंबर रोजी येत्या तीन वर्षांकरिता या सलागार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षतेखाली. ३८ सदस्यांची ही समिती घोषित केली आहे. कवी प्रकाश होळकर यांचेबरोबर सिने अभिनेते व कवी सयाजी शिंदे ,कवी सौमित्र उर्फ कवी किशोर कदम यांचेसह मान्यवर यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा अद्यावत होण्यासाठी विविध उपाययोजना करणे ,मराठी भाषा कोश अद्ययावत करणे यासह विविध शासनास मार्गदर्शन करण्यासाठी नामवंत साहित्यिक, कवी,अभ्यासक यासह शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांची समावेश असलेली ही समिती साहित्य क्षेत्रात महत्वाची मानली जाते.
लासलगाव भूषण कवी प्रकाश होळकर यांच्या साहित्य विषयक योगदानाची दखल घेऊन या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल कवी प्रकाश होळकर यांचे लासलगाव चे सरपंच जयदत्त होळकर यांचेसह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.