मु्ंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मेड इन हेवन या वेब सीरिजचा दुसरा भागात राधिका आपटेच्या सीनचे कौतुक केले आहे. अभिनेत्री राधिका आपटेमुळे ही सीरिज चर्चेत आहे. या सीरिजच्या दुस-या भागात आंतरजातीय विवाहसोहळा दाखवण्यात आला आहे. त्यात राधिकाचा होणारा पती हा उच्चभ्रू हिंदू जातीय असतो. तर त्यात राधिका ही तिच्या होणाऱ्या पतीला हिंदू विवाहपद्धतीसोबतच बौद्ध पद्धतीनं लग्न सोहळ्यास तयार करते. त्यामुळे हा सीन चर्चेत आला आहे.
या चर्चेत असलेल्या सीनचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कौतुक केले आहे. या एपिसोडमधील दोन फोटोही त्यांनी शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी म्हटले ‘मला दलित स्त्री पात्र पल्लवीची जिद्द, अवहेलना आणि प्रतिकार आवडला. तुम्ही सर्व वंचित आणि बहुजनांनी ही सिरीज जरुर पहावी. तरच तुम्ही स्वतःची ओळख सांगू शकाल आणि तुम्हाला राजकीय महत्त्व प्राप्त होईल.